जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे अबॅकस वर्गातील मुलांच्या माता पालकांचा मेळावा उत्साहात संपन्न

Uncategorized

प्रतिनिधी –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे फेब्रुवारी २०२४ पासून माता पालक गटाच्या मागणीतून मुलांचे अबॅकस वर्ग सुरू असून शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे, सौ मनिषा चव्हाण शाळेतील सर्व शिक्षकांच्या नियोजनातून को-हाळे येथील अबॅकस संचालिका सौ शितल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली १० फेब्रुवारी पासून सदरचे वर्ग सुरु आहेत . स्वतः तज्ज्ञ असल्याने क्लास मधील १ते४ मधील ३१ विद्यार्थी सहभागी झाले असून प्रथम लेवलचा अभ्यास काही विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे. शाळेच्या आग्रही भूमिकेमुळे जादाचा वेळ देऊन त्या मुलांची तयारी छान करताना दिसून येते प्रत्येक विद्यार्थाला वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करून १००% मुलांची तयारी करण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत .

लहान वयात मुलांना अबॅकस मुळे शालेय अभ्यासात फायदा होत असल्याचे मत पालकांनी बोलून दाखवले . पहिल्या लेवलला मुले छान प्रतिसाद देत असून अ बॅकस शिवाय ही क्रीया करताना दिसून येते . सदर माता पालक मेळाव्यात पालकांनी अबॅकस बाबत फायदे, मुलांना होणारे उपयोग विषयी माहिती विचारली . मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते व संचालिका सौ शितल भगत यांनी त्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले . लहान वयात जास्ती चा फायदा होत असून मेंदूचा जास्तित जास्त वापर करण्याची क्षमता वाढ, तर्कसंगत विचार , कल्पना शक्तीला चालना, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणेस मदत होत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आणून दिले .

सदर मेळाव्यात सर्व विद्यार्थी अबॅकस व अबॅकस शिवाय गणिती क्रीया जलद करतात याचे प्रात्यक्षिक पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले . शाळेतील उपशिक्षिका सै मनिषा चव्हाण यांनी अबॅकस मुळे त्यांच्या मुलाच्या अभ्यासात अबॅकस मुळे झालेले बदल पालकांना सांगितले . शाळेच्या या उपक्रमामुळे ग्रामिण भागतील मुलांनाही अबॅकस शिकाण्याची संधी शाळेतील शिक्षकांनी मिळवून दिले बद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले . पुणे जिल्ह्यात उपक्रमशील शाळा म्हणून कांबळेश्वर शाळेकडे पाहिले जाते . जिल्हाभरात अनेक उपक्रम होत असतात परंतू कांबळेश्वर शाळेतील शिक्षक पालक यांच्या एकत्रित सकारात्मक प्रतिसादातून विद्यार्थी हिताचे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर शाळेचा भर असतो . साहजीकच इंग्रजी / खाजगी माध्यमातून विद्यार्थी गुणवत्ता पाहून शाळेत प्रवेश घेतात . दाखल विद्यार्थ्यांना १००% गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थी हिताच्या उपक्रमांना पालक शिक्षक सहकार्यातून वाव मिळत असल्याने मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी सांगितले .

शाळेमध्ये मागिल वर्षात ४५ दिवसांचे बालसंस्कार वर्ग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग याही वर्षात सुरु ठेवणेबाबत पालकांनी मागणी केली. शाळेच्या उपशिक्षीका सौ सुनिता शिंदे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली .