*मु.सा काकडे महाविद्यालयात पोलीस भरती कार्यशाळा व चर्चासत्र उत्साहात संपन्न*

Uncategorized

प्रतिनिधी.

*सोमेश्वरनगर : येथील मु.सा काकडे महाविद्यालयात पोलीस भरती कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य रवींद्र जगताप,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र टकले, स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे संस्थापक गणेश सावंत, माझी सैनिक अंकुश दोडमिसे
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे सर होते. प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालय पूरवत असणाऱ्या सुविधांविषयी महिती दिली व भविष्यातही सोयी सुविधा पुरवल्या जातील असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई पदावरून अधिकारी पदापर्यंत मजल मारावी अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उमेश रुपनवर सर यांनी पोलीस भरतीतील जिल्हा निवड हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे भरतीतील आरक्षण, भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी अभ्यासातील सातत्य व प्रामाणिकपणा यामुळे आपल्याला वर्दी नक्की मिळवता येते. असा आत्मविश्वास व्यक्त केला.आरक्षण प्रक्रिया याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद अभ्यासिका,योद्धा करिअर अकॅडमी, कृष्णाली अभ्यासिका, यांचे सहकार्य लाभले.या कार्यशाळेसाठी ४५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यशाळेसाठी व पोलीस भरतीचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे-देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे-देशमुख, संस्थेचे सचिव लकडे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.दत्तराज जगताप यांनी केले. आभार प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे यांनी मांनले.