• Home
  • माझा जिल्हा
  • महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजउपयोगी उपक्रम “8 नंबर बॉईज” ग्रुपच्या माध्यमातून अखंडित सुरूच…
Image

महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजउपयोगी उपक्रम “8 नंबर बॉईज” ग्रुपच्या माध्यमातून अखंडित सुरूच…

बारामती.

प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त नगरपालिकेच्या 8 नंबर शाळा येथे शालेय साहित्य वाटप व मिशन बोर्डिंग येथे अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व सन्मान सोशल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. दरवर्षी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विधायक उपक्रम 8 नंबर बॉईज या ग्रुपच्या वतीने आयोजित केले जातात. तसेच यंदा वन्यजीवांना मुक्या प्राण्यांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची वणवण करावी लागते त्या अनुषंगाने फॉरेस्ट विभागातील पानवठ्यांवर टँकरद्वारे पाणी देण्यात येणार आहे, असेही उपक्रम जयंती महोत्सवानिमित्त संपन्न होणार आहेत. यावेळी जयसिंग बबलू देशमुख नगरसेवक बानप, गणेश गुरव साहेब सहाय्यक व्यवस्थापक वन विभाग पुणे, शशांक भैय्या झगडे, ओंकार देशमुख, ओंकार जाधव, हर्ष बाळा मोरे, सचिन जगदाळे, महेश गायकवाड, कुणाल काळे, आदित्य हिगणे, कल्पेश लोणकर, अभिजीत ओझर्डे, जयेश गायकवाड, विक्रांत आढाव, परशुराम भोसले, चेतन साळुंखे, सुरज साळुंखे, सुरज गायकवाड, योगेश नालंदे , एडवोकेट अमर गाढवे, अमोल बनकर, नितीन आप्पा मदने, गणेश मोरे, आसिफ सय्यद, अमोल सोनवणे, सॅम गायकवाड, अमोल वायदंडे, अमर अहिवळे, रोहित अहिवळे, सिद्धार्थ सोनवणे, रंजन लोहार, चेतन जावळे, मंगेश घनवट, सुमित जाधव, आकाश सोनवणे, चिन्मय कुलकर्णी आणि ग्रुपच्या सर्वच सदस्यांनी बहुमोल सहकार्य केले.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026