• Home
  • माझा जिल्हा
  • *बारामती लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती*
Image

*बारामती लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती*

प्रतिनिधी

बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती आनंधी पालानीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०१ असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ८९९९१५७६०९ असा आहे. तसेच निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी दिगंबर हौसारे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९३७०९०८२६२ असा आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-२०५ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९५२९१४८६१९ असा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी गणेश सस्ते असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८९०९४९५८७ असा आहे.

निवडणूक निरीक्षक बारामती लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ दुपारी ३.३० वाजेपासून ते सायं. ५.३० वाजेपर्यंत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

Releated Posts

बारामती ! कोऱ्हाळे बुद्रुकच्या बस थांब्यावर मुजोर धनदांडग्यांची पार्किंग ; प्रवाशांची गैरसोय

प्रतिनिधी – आधीच अखेरची घटका मोजत असलेल्या कोऱ्हाळे बुद्रुकच्या बस थांब्यावर अनेक जण मोठे फ्लेक्स लावत असतात. त्यातच…

ByBymnewsmarathi Dec 15, 2025

कामाच्या तासानंतर ‘डिस्कनेक्ट’ राहण्याचा हक्क: ‘राईट टू डिस्कनेक्ट’ विधेयक संसदेत सादर 

प्रतिनिधी ​कर्मचाऱ्यांच्या ताणमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; खासगी सदस्याचे विधेयक सादर.  आधुनिक कार्यशैलीमध्ये कर्मचाऱ्यांवरील वाढता मानसिक ताण आणि कामाच्या तासांनंतरही…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

प्रवेशापूर्वी गर्भधारणा चाचणीची सक्ती; चौफेर टीका झाल्यावर नियम तत्काळ रद्द;

प्रतिनिधी   ​पुणे जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ (गर्भधारणा चाचणी) अनिवार्य करण्यात आल्याची धक्कादायक…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

सोमेश्वरने केली एफ.आर.पी. वरील व्याजाची रक्कम जमा

प्रतिनिधी शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025