Image

देशाला फक्त आंबेडकरवादच वाचवु शकतो….सुरज वनसाळे

प्रतिनिधी.
दोस्ती मित्र मंडळ,आठदारे – लासुर्णे,तालुका इंदापूर यांच्या वतीने रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता साजरा करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती महोत्सवात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ” मी आंबेडकरवादी ” सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांनी सांगितले की, या देशामध्ये भारतीय संविधान व भारतीय लोकशाही धोक्यात असुन जर या देशाला अशा परिस्थितीतुन कोण वाचवणार असेल तर तो आंबेडकरवादच आहे तसेच प्रत्येक घरात, प्रत्येक मातेच्या कुशीतून एक आंबेडकरवादी जन्माला यावा असे उद्गार काढले.
यावेळी सर्व महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून सुरज वनसाळे व महेश लोंढे यांच्या हस्ते नील ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरज वनसाळे होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अमर हजारे सर, प्रमुख पाहुणे महेश लोंढे, गजानन वाकसे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे, सुर्यगंध सर, उत्तम सावंत, आण्णा भोसले, पोपट आठवले, महेश रूपनवर, उबाळे सर, वामन वाघमारे, सोमनाथ कांबळे, समाधान जावीर, आनंद फरतडे हे उपस्थित होते.
सुत्रसंचलन मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे सचिव अनिल केंगार यांनी केले तर आबा चंदनशिवे, गोपाळ जावीर, दयानंद खरात, आकाश वाघमारे, सौरभ करडे, अतूल काटे, प्रमोद जावीर व जयंती उत्सव समितीने चांगल्या पद्धतीने नियोजन केले होते. स्थानिक नागरीकांनी कार्यक्रमाला चांगला उत्साहात प्रतिसाद दिला.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026