बारामती – प्रतिनिधी
फेब्रुवारी २०२४ पासुन पाटस ते बारामती राष्ट्रीय महामार्ग क्रं. ९६५ जी (संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग) वर चौपदरी रस्त्याच्या केलेल्या कामाच्या बदल्यात उंडवडी ता. बारामती येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिल्ली यांच्यामार्फत टोलद्वारे फास्टटॅग वापरुन वसुलीचे काम सुरु झालेले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवि दिल्ली परिपत्रक क्रं. No.NHAI/13013/CO/24-25/CAG/ActionTaken Note/efile-248809_02 दि.१०/०५/२०२४ द्वारे राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व वाहनधारकास आवाहण करण्यात येत आहे की, टोल प्लाझा पास करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने, वाहन धारकाने रोख पैसे न देता वाहनास अधिकृत फास्टटॅग लावुनच टोल प्लाझा पास करावा तसेच स्थानिक नागरिकांसाठी सवलतीच्या दरात नियमानुसार मासिक पासची पण व्यवस्था केलेली आहे तरी सर्व वाहन धारकाने व स्थानिक वाहन धारकाने टोल प्लाझा पास करताना अधिकृत फास्टटॅग लावुन तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या नियमाप्रमाणे व सवलतीनुसार टोल प्लाझावर मासिक पास देण्याची सोय केलेली आहे. तरी विशेष करुन स्थानिक वाहनधारकास आवाहन करण्यात येते की, आपण फास्टटॅग द्वारे सवलतीचा फायदा घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व हुले कंस्ट्रक्शन प्रा.लि. तर्फे करण्यात येत आहे