बारामती! कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे सस्तेवाडी येथे खरीप हंगामाचे पूर्व प्रशिक्षण .

माझा जिल्हा

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक, सोयाबीन बियाणे बीजप्रक्रिया व हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे प्रात्यक्षिक राबविण्यात आले.

या कार्यक्रमात सोयाबीन बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याने घ्यावयाची काळजी, घरगुती व विकतचे बियाणे यांची उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी व पेरणीपूर्वी रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी . याबाबत कृषी सहाय्यक श्री मिथुन बोराटे यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले .

याचबरोबर हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतामध्ये प्रकाश सापळे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व प्रकाश सापळे करणेबाबत शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले .