• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! ड्रोन फिरतात म्हणून वडगाव निंबाळकर पोलिसांचे नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन मात्र त्या रात्रीच वडगाव निंबाळकर परिसरमध्ये पाच ठिकाणी घरफोडी .
Image

बारामती ! ड्रोन फिरतात म्हणून वडगाव निंबाळकर पोलिसांचे नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन मात्र त्या रात्रीच वडगाव निंबाळकर परिसरमध्ये पाच ठिकाणी घरफोडी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

एक दिवसापूर्वीच कोऱ्हाळे बुद्रुक येथे ड्रोन फिरत असल्याची सोशल मीडिया वरती बातमी प्रसारित झाली होती. यावेळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र घाबरून न जाण्याचे आवाहन केल्याच्या रात्रीच वडगाव निंबाळकर मध्ये पाच ठिकाणी घरफोडी झाली . यावेळी नागरिकांमध्ये जास्तच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांमध्ये चर्चा आहे की पोलीस प्रशासनाने भिऊन न जाण्याचे आवाहन केले त्या रात्रीच चोरट्यांनी घरफोडी करून पोलिस प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिउत्तर दिले? अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. वडगांव निंबाळकर याठिकाणी गुरवार रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करत रोख रकमेसह सोन्याची देखील चोरी झाल्याचे समजत आहे .

वडगाव निंबाळकर , बनकर वस्ती ,जाधव वस्ती , जाधव आळी याठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे . या घटनेमध्ये पत्रकार सुनील जाधव यांच्या घरफोडीत आठ तोळे सोने व दीड लाख रुपये चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे . यामध्ये सर्वांचे लक्ष्य पोलिस प्रशासनाकडे लागले आहे की या चोरांचा पोलीस प्रशासन किती दिवसात छडा लावणार ?

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026