• Home
  • माझा जिल्हा
  • पुण्यानंतर पिंपरीतही पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू
Image

पुण्यानंतर पिंपरीतही पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू

प्रतिनिधी

पुण्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घराच्या अंगणात खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

गणेश बालाजी मंजलवार (वय ३) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. मंजलवार कुटुंबीय भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये राहतात. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिमुरडा गणेश मित्रांसोबत अंगणात खेळत होता. त्यावेळी तोल गेल्याने गणेश खड्ड्यात पडला. गणेशसोबत खेळत असलेल्या मुलांनी त्याच्या आईला याबाबत माहिती दिली.

आईने धावत जाऊन गणेशला खड्ड्याबाहेर काढले. गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026