• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! बारामती कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषी कन्या करणार वडगाव निंबाळकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
Image

बारामती ! बारामती कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषी कन्या करणार वडगाव निंबाळकर शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील शारदानगर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे वडगाव निंबाळकर येथे शेतकरी मार्गदर्शन सत्र चालू करण्यात आहे . वडगाव निंबाळकर गाव परिसरातील शेतकरी बांधवांना या कृषी कन्या ठिकठिकाणी जाऊन योग्य सल्ले व मार्गदर्शन करत आहेत. ज्ञानेश्वरी खळदकर,नेहा पडवळ, गायत्री बल्ले, दिशा मोरे, आदिती माने,साक्षी कोते व नेहा पाटील या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यकर्म २०२४- २५अंतर्गत सात आठवडे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी कृषी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य व सुख सुविधांनी परिपूर्ण असलेल्या वडगाव निंबाळकर या गावची निवड करण्यात आली आहे.

वडगाव निंबाळकर गाव शेती व्यवसायात अग्रेसर आहे, विविध फळे, फुले,भाजीपाला इतर सर्व पिके जोमात असतात.तसेच विविध संशोधन प्रक्रिया केली गेली बि.बियाणे, रोपे यांची लागवड केली जाते. तसेच सेंद्रिय शेती आधुनिक शेती प्रणालीचा वापर वडगाव निंबाळकर गावचे शेतकरी बांधव करीत असतात असे सरपंच सुनील ढोले यांनी संबोधले . कृषिकन्या ठिकठिकाणी जाऊन कार्यशाळा आयोजन करून शेतकरी बांधवांना माहिती देत आहेत व नवीन नवीन माहिती आत्मसात करत आहेत. या विद्यार्थिनी म्हणजे उद्याचे भविष्य आहे या कृषी कन्या म्हणून ओळखले जाणार आहेत.

यावेळी वडगाव गावचे सरपंच सुनील ढोले,उपसरपंच संगीता शहा, ग्रामविकास अधिकारी अनिल हिरास्कर , जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र पवार, रामभाऊ खंडाळे , ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते. या कृषी कन्या कार्यशाळा सत्रामध्ये महाविद्यालयाच्या प्रा. जया तिवारी कार्यक्रम समन्वयक प्रा. निळकंठ जंजिरे कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी देवकाते व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन या कार्यशाळा सत्रामध्ये कृषी कन्यांना लाभत आहे .

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026