• Home
  • माझा जिल्हा
  • डॉ. गंगाधर मोरजे यांनी लोकसाहित्याला वैश्विक दृष्टिकोन दिला— डॉ. अनिल सहस्रबुद्धे
Image

डॉ. गंगाधर मोरजे यांनी लोकसाहित्याला वैश्विक दृष्टिकोन दिला— डॉ. अनिल सहस्रबुद्धे

दिवंगत डॉ. गंगाधर मोरजे यांनी लोकसाहित्याच्या क्षेत्रामध्ये वैश्विक दृष्टिकोन देण्याचे काम केले. लोकसाहित्याचा अभ्यास हा प्रयोगनिष्ठ वाड:मय कलेचा अभ्यास आहे, असे ते मानत असत. त्याचबरोबर साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजेत असा त्यांचा विचार होता असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.
दिवंगत साहित्यिक डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पद्मगंगा फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. हमाल पंचायत येथील सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमास पद्मगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर, समिक्षक डॉ. सुधाकर शेलार, डॉ. संदीप सांगळे, डॉ. मुसा बागवान, डॉ. सुनील शिंदे, डॉ. धोंडीराम वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी डॉ. संजीव कुलकर्णी (कथा संग्रह – शास्त्र काट्याची कसोटी), कवयित्री सरोज अल्हाट (काव्य संग्रह अनन्यता), अंबादास हिंगे (कादंबरी – शिवराम), कुष्णा जाधव (संत साहित्य – एक तरी ओवी), प्रदिप मेहेंदळे (आत्मकथन), डॉ. हंसराज जाधव (महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळी आणि मराठी साहित्य), डॉ. भारत हंडीबाग (गौरव ग्रंथ) यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार तर ॲड. विश्वनाथ गोलावर (समाजभूषण), प्रा. डॉ. दत्तात्रय वाघ यांना (आदर्श प्राचार्य), रवींद्र काळे (शैक्षणिक), अविनाश कदम (दर्पण पत्रकारिता), डॉ. सुभाष नागरगोजे (क्रीडारत्न) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
डॉ. अनिल सहस्रबुद्धे पुढे म्हणाले की, डॉ. धोंडीराम वाडकर यांनी आपले गुरुवर्य दिवंगत प्रा. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पद्मगंगा फाउंडेशन ची स्थापना केली. गेल्या १७ वर्षापासून ते साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारिता, समाजकार्य व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करतात. या माध्यमातून सबंध समाजाला प्रोत्साहित करण्याचे काम डॉ. धोंडीराम वाडकर करतात.यावेळी डॉ. सुधाकर शेलार, डॉ. संदीप सांगळे, डॉ. मुसा बागवान डॉ. सुनील शिंदे, कवयित्री सरोज आल्हाट, प्राचार्य दत्तात्रय वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल बरसमवाड यांनी सूत्रसंचालन केले. तर कल्याणी बरसमवाड यांनी आभार मानले. प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमास
उपप्राचार्य डॉ. आप्पासाहेब टाळके,प्रा रमेश खिळदकर, पत्रकार भगवान राऊत, पत्रकार जावेद पठाण, डॉ सुनिल गदादे, डॉ विष्णू साबळे, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य, प्रोफेसर बाबासाहेब झिने, डॉ. शत्रुघ्न करडुळे डॉ. अनिल हजारे, दत्तात्रय गिलचे, विठ्ठल गोरे व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026