बारामती ! ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथे जनजागृती.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगांव निंबाळकर येथे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत स्वातंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘आरोग्य,निरोगीपणा व मासिक पाळी ‘ या विषयी जनजागृती केली.

यावेळी वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनिल ढोले , मुख्याध्यापक हेमंत तांबे सर, पर्यवेक्षक हेमंत बनगर तसेच प्राध्यापक उर्मिला देशमुख व जयश्री दरेकर , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ.हाके व आरोग्यसेविका यांनी कृषीकन्यांसमवेत मुलींमध्ये जनजागृती केली.

यावेळी दिक्षा मोरे हिने विद्यार्थिनींना मासिक पाळी विषयी माहिती तसेच आहार व व्यायाम याविषयी ज्ञानेश्वरी खळदकर व नेहा पडवळ यांनी माहिती दिली. साक्षी कोते, नेहा पाटील , अदिती माने यांनी होर्मोनाल बदल, पीसीओडी , पीसीओस यांनी किशोरवयीन मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच आरोग्यसेविकांनी स्वच्छतेविषयी देखील माहिती दिली.मुलींनी या कार्यक्रमास खुप चांगला प्रतिसाद दिला.

साक्षी कोते ,नेहा पाटील ,अदिती माने,नेहा पडवळ, दिक्षा मोरे , ज्ञानेश्वरी खळदकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला.ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे, प्राचार्या प्रा.जया तिवारी, कार्यक्रम समन्वयक प्रा.नीलकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ.पल्लवी देवकाते,डॉ.मयुर पिसाळ,प्रा.शिवानी देसाई,प्रा.अभिषेक गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.