श्री बा.सा.काकडे देशमुख विद्यालय पिंपरे येथे श्री अभिजीत काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

Uncategorized

 

प्रतिनिधी.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक हे नेहमीच आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत करीत असतात इतर वेळी ही परिसरातील कोणत्याही विद्यार्थ्यास काही शिक्षणाकरता अडचणी असल्यास सढळ हाताने मदत करणे हा त्यांच्या स्वभावातला विशेष गुण आहे.
श्री अभिजीत काकडे यांच्या आज वाढदिवसाचे औचित्य साधून श्री बाबा लाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बाबा लाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द चे मुख्याध्यापक श्री नेवसे सर यांनी संचालक अभिजीत राव काकडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अभिजीत काकडे म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने शिक्षणाकडे अभ्यासाकडे लक्ष द्यावे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुमचा मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या नेहमीच पाठीशी असेल असे अश्वस्थ केले.
यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.