नींबूत येथे मोहरम सन उत्साहात साजरा

Uncategorized

नींबूत तालुका बारामती येथे सालाबादप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम हा सण उत्साहात पार पडला इस्लाम धर्मानुसार मोहरम हा मुसलमान समाजाचा वर्षारंभ आहे या महिन्यांमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन व हुसेन धर्माच्या प्रचारासाठी निघाले असता त्यांना करबलाच्या मैदानात त्यांच्या शत्रूंनी शहीद केले म्हणून त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून मोहरम हा सण ताबूत बसून साजरा करण्यात येतो
मोहरमच्या पहिल्या रात्री सर्व भाविक भाताची खिचडी, भाजी ,सरबत यांचा नैवेद्य दाखवतात त्या दिवशी मन्सूर सय्यद, जुम्मन सय्यद यांच्याकडून सरबत चे वाटप सर्वांना करण्यात आले यावेळी सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ताबूत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या सणाचे सर्व विधी पार पाडण्यासाठी फौजी यासर सय्यद, जुम्मन सय्यद, जावेद शेख, अरिफ सय्यद, शाहिद सय्यद, राजू सय्यद, लतीफ सय्यद, रेहान शेख यांनी विशेष सहकार्य केले यावेळेस करंजे पूल दूरक्षेत्र चे पोलीस भोसले साहेब यांनी चौक बंदोबस्त ठेवून सहकार्य केले