प्रतिनिधी
माझी बहीण सीए फायनलपर्यंत पोचली होती. खात्रीने सीए झाली असती. पण ते नियतीला मंजूर नव्हते.2003 साली अल्पशा आजाराने ती आम्हाला सोडून गेली.अखेर तिचे स्वप्न मी माझे स्वप्न बनविले. बारावी विज्ञान नंतर कॉम्प्युटर सायन्सला मिळालेला प्रवेश रद्द करून कॉमर्सकडे वळालो. माझी पूर्ण फॅमिली सीएचे स्वप्न जगू लागली. फाउंडेशन, आर्टीकलशिप आणि इंटर २०१२ पर्यंत पूर्ण केले. पुढे नोकरी, कुटुंब सांभाळतानाही एकवीस वर्ष स्वप्नाचा पाठलाग सुरूच ठेवला आणि अखेर सीए झालो,” मात्र यासाठी खूप मेहनत खूप कष्ट अभ्यास करावा लागला यासाठी माझे आई-वडील माझी पत्नी माझी कुटुंब माझे मामा यांचे मला खूप सहकार्य लाभले. असे सत्काराला उत्तर देताना CA शशांक गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी सनदी वकील परीक्षा पास झाल्यानंतर एडवोकेट ऋषिकेश जगताप यांची आई शिल्पा जगताप व वडील बाळासाहेब जगताप यांनी ऋषिकेश च्या वतीने सन्मान स्वीकार केला खरंतर ऋषिकेश च्या घरची परिस्थिती ही जेमतेम होती मात्र शून्यातून विश्व घडवण्याचा विक्रम ऋषिकेशने केल्याने घरच्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी शिल्पा जगताप यांनी बोलताना सांगितले की माझ्या समाजातील सर्व मुलांनी अशीच प्रगती करत पुढे जावे आणि यशाची उंच उंच शिखरे पार करावीत. ऋषिकेश च्या शिक्षणासाठी ऋषिकेश चा लहान भाऊ रोहित याचे देखील खूप मोठे योगदान असल्याचे शिल्पा जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमासाठी मान्यवर युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत बनसोडे यांनी केले व आभार मधुकर बनसोडे यांनी मानले.