पुरंदर. निरा गावात गाव गुंडाची तरुण व ज्येष्ठ नागरिकास मारहाण. दहशत माजवण्याचा प्रयत्न.

Uncategorized

पुरंदर : नीरेच्या रहदारी असलेल्या पालखीतळा समोर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक गुंडाकडून दहशत निर्माण करत दवाखान्यातून आलेल्या बापलेकांना जबर मारहाण करत त्यांची दुचाकी पेटवून देण्यात आली आहे. याबाबत नीरा पोलीसात जखमी सचिन कोरडे रा. खंडोबाचीवाडी (ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून निरीकडे पाहिले जाते. या झालेल्या हल्ल्यामुळे निरा  व परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कोरडे यांचे वडिल संपत कोरडे एक गंभिर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर सातारा (शेंद्रे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांना ट्रकमध्ये बसवून सचिन आपल्या अपाची दुचाकिवरुन नीरेत आले. पालखी तळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ट्रक आल्यावर वडिलांना खाली घेत असताना नीरेतील एक गाव गुंड आला व शिविगाळ करत दमबाजी करायला लागला. सचिनच्या डोळ्यात लाल तिखट चटणी टाकली, आधी सचिनला धक्काबुक्की केले व हातातील हत्याराने सचिन यांच्या डोक्यात जब्बार घाव घातल्याने रक्तस्राव झाल. ते जखमी झाल्याने दुचाकी तेथेच सोडून त्यांनी गावगुंडाच्या तावडीतून सुटका करण्या हेतू तेथून पळ काढला. तरीही त्या गावगुंडाने आजारी असलेल्या वडिलांवरही हल्ला केला. या नंतर अपाची दुचाकी घेऊन जेजुरीकडे पसार झाला. नंतर कळाले की ती दुचाकी त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळून टाकली. शिवाजी चौकात पेटती दुचाकी पाहून स्थिनक भयभीत झाले. नीरा पोलिस दुरक्षेत्राचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जखमी सचिन कोरडे यांना उपचारासाठी नीरेच्या जिवनदिप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

नीरेतील हा गावगुंड सतत चर्चेत राहण्यासाठी काहीतरी गुन्हेगारी कृत्य करत असतो. मागिल गुन्ह्यातून तो चारच दिवसांपूर्वी कारागृहातून घरी आला होता. तो नीरेत आला की नीरा रेल्वे स्टेशन व परिसरात धुडगूस घालतोच. चोरी, लुटमार, मारामारी, धमकावणे, दहशत निर्माण करणे अशी कृत्ये करत असतो. अशा सराईत गुन्हेगारास त्वरित जेरबंद करून कायमचा  बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.