भोर प्रतिनिधी.
रविवार दिनांक २१/७/२०२४ रोजी गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने भोर येथील निर्मलाताई थोपटे बी.एड. महाविद्यालयातील त्यावेळेसचे प्राध्यापक (शिक्षक/गुरु) व विद्यार्थी एकत्र येत अतिशय आनंदी वातावरणात “स्नेह मेळावा “भोर बी.एड महाविद्यालयाच्य सभागृहात आयोजित केला होता. विद्यार्थी प्राध्यापक अतिशय आनंदी, उत्साह पूर्ण वातावरणात फेटे बांधून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या मेळाव्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने , स्वागतगीत ,आणि गुरु वंदनेने करण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
स्वागत कार्यक्रमानंतर उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांची मनोगते घेण्यात आली. मनोगतांमध्ये जुन्या अनुभवांना उजाळ देत. सध्या काम करत असलेल्या शाळेतले अनुभव कौटुंबिक पार्श्वभूमी, आणि सद्यस्थिती याविषयी मनोगत व्यक्त केली. ही मनोगते ऐकत असताना, प्रत्येकाचे विचार ऐकताना सर्वजण भारावून गले होते. विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील प्रगती पाहून गुरूंना सुद्धा आनंद झाला असून त्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळांमध्ये गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम साजरे होतात परंतु निर्मलाताई थोपटे बी.एड महाविद्यालयांमध्ये१९९३-९४ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या समवेत “गुरुपौर्णिमा” स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने साजरी करून एक चांगला आदर्श निर्माण करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
स्नेह मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य डॉ.मोहन कांबळे (प्राचार्य, आदर्श बी.एड महाविद्यालय ,पुणे) प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संध्या चव्हाण (प्राचार्य ,बी.एड महाविद्यालय भोर) हे उपस्थित होते.
गुरुवर्य प्रा. डॉ बाळासाहेब माशेरे, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, डॉ.सुरेखा कुलकर्णी, डॉ. प्रदीप शेळके, प्रा. वैद्य मॅडम, ,श्री. विठ्ठल कोंडे, श्री. टापरे दादा, व अन्य शिक्षक वृंद उपस्थित होते.
१९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या “स्नेहमेळा” कार्यक्रमासाठी ६०ते ७० विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक वृंदांना भेट वस्तू देऊन शाल, श्रीफळ, फेटा बांधून, बुके देऊन अतिशय आदरपूर्वक, इथोचित सन्मान केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील घुमटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात व नियोजनात श्री. अनंता कदम,, सुनील जगदाळे, कदम क्षितिज, हेमंत विश्वासराव, गाडेकर लक्ष्मण, शिंदे तानाजी, दत्तात्रय डफळ, ज्ञानेश्वर थिटे,साहेबराव भालेकर, दत्तात्रय वाघमोडे, तानाजी शिंदे, हेमंत तांबे, प्रवीण शिंदे,रमजान हवालदार, मुख्तार मुलानी, संतोष लोहोकरे, गांडेकर लक्ष्मण, यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सांगता डॉ.रोहिणी माशेरे यांच्या सुमधुरआवाजातील “पसायदानने” झाली.
निर्मलाताई थोपटे बी.एड. महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी ग्रुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित अशा आगळ्यावेगळ्या” स्नेह मेळाव्याचे” सर्वत्र कौतुक होत असून अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून चांगला आदर्शसंदेश सर्वांपर्यंत पोहोचविला आहे. मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी एकदा तरी गुरु शिष्य एकत्रित भेटीचा कार्यक्रम आयोजनाच्या बाबतीत, आणि महाविद्यालयाच्या प्रगतीचा संकल्प देखील करण्यात आला