मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना भारी ‘ पण बहिणी ऑनलाईन फॉर्म भरण्यावाचून राहत आहेत वंचित ; प्रशासनाने यावर लक्ष्य द्यावे बहिणींची मागणी.

माझा जिल्हा

प्रतिनिधी – फिरोज भालदार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऑनलाईन फॉर्म भरताना महिलांची नाराजी ; प्रशासनाने या विषयावरती लक्ष द्यावे लाडक्या बहिणींची मागणी .

मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढून आमलात तर आणली मात्र त्या योजनेच्या लाभापाई लाडक्या बहिणींची अवस्था कश्याप्रकारे झाली आहे हे चित्र पहावेसे वाटेना . या योजनेमध्ये महिलांना लाभ भेटणार यासाठी सर्व महिला ऑफलाईन , ऑनलाईन फॉर्म भरताना संपूर्ण महाराष्ट्रात चित्र दिसत आहे. आपण सर्व महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण चा फॉर्म भारत आहोत मात्र हा लाभ नक्की भेटणार का ? अशी चर्चा देखील महिलांमध्ये होताना दिसत आहे .

 महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपय महिना देणार मात्र फॉर्म भरण्यासाठीच आमचे पहिलेच एक हजार रुपय च्या आसपास खर्च होत आहे. त्यात देखील आपला फॉर्म भरताना काय चुकत आहे का , कुठल्या कागदपत्राची त्रुटी राहत आहे का जर काय त्रुटी राहिली तर आपल्याला पैसे येणार नाहीत असे त्यांचे मनात प्रश्न निर्माण होत आहे . महिला आपले काम सोडून दिवस दिवस फॉर्म भरण्यासाठी घालवत आहेत . मजुरी करून पोट भरणारे महिला आपल्या कामाचे खडे करून हा फॉर्म भरत आहेत मात्र ह्या फॉर्म ची वेबसाईट चालत नसल्याने कित्येक दिवस हेलपाटे महिलांना फॉर्म भरण्यासाठी मारावे लागत आहेत.

फॉर्म भरताना वेबसाइट मध्ये देखील प्रॉब्लेम येत असल्यामुळे महिलांचे दिवस दिवस बसून देखील फॉर्म भरून होत नाहीये . हा फॉर्म भरण्यासाठी सुविधा केंद्र वाले मनाले वाटेल तेवढे पैसे घेत आहेत . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने महिलांसाठी आणली भारी मात्र महिला ह्या योजनेला कागदपत्राने आणि ऑनलाइन फॉर्म भरत नसल्याने संताप व्यक्त करत आहेत . लाडक्या बहिणी या येजनेचा लाभ घेण्यासाठी एवढी धावपळ करतायेत, पैसे आणि वेळ घालवतायेत मात्र या योजनेचा सर्व बहिणींना लाभ मिळणार का ? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे .