विश्रांतवाडी येथील सिद्धार्थ दवाखाना आणि आळंदी रोड पोलिस चौकीची इमारत शेवट च्या घटका मोजत आहे?

Uncategorized

प्रतिनिधी.

इमारतीची दुरवस्था झालेली आहे सामान्य नागरिकांना वृध्दांना सरकारी दवाखाना हाच आधार असताना याच दवाखान्याची वाईट अवस्था पाहून सामान्य नागरिकांना असे वाटत आहे की हा दवाखाना सामान्य माणसाच्या आयुष्यातील आधार आहे की महानगरपालिका जाणून बुजुन परिसरातील खाजगी रुग्णालयाची मदत होईलअशा हेतुने सिध्दार्थ दवाखाना आणि त्याची इमारत कडे लक्ष देत नाही. जिन्याची दुरवस्था झाली आहे. वृद्ध महिला तसेच गरोदर स्त्रिया यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी जीव मुठीत घेऊन वरती चढावे लागत आहे. उपचारासाठी आलेल्या व्यक्तीच्या जीवितस काही बरे वाईट झाल्यास त्याच्या वारसाला मदत देण्यापेक्षा इमारतीची दुरुस्ती अथवा नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करता येईल का याकडे प्रसंबंधी प्रशासनाने लक्ष द्यावे. दवाखान्याच्या छता तून पाणी पडत आहे. आमच्या टीम ने पाहणी केली असता असे लक्षात आले की, येथील ठिकाणी कुठलेही नगर सेवक,स्थानिक प्रतिनिधी नामांकित स्वयं घोषित नेते लक्ष देत नाही. किंवा त्यांना त्याचे काही घेणे देणे नाही.?
मोडकळीस आलेल्या इमारतींना महानगरपालिका नोटीस बजावण्यात पुढे आहे. कारण त्यांची आर्थिक देवाण घेवाण आहे. परंतु या महानगरपालिकेच्या स्वतःच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट घेण्या साठी महानगरपालिका किंवा स्थानिक लोप्रतिनिधींनी काहीच करत नाही. सदर इमातींमधील दवाखान्यात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक, लहान मुले औषोधोउपचारासाठी मोठया प्रमाणावर येत असतात. याची कल्पना काय लोकप्रतिनिधी ना नाही का.असा सवाल ही आता नागरिकांमधून विचारला जातोय.