Image

अतिक्रमण कारवाई दरम्यान तरुणाने स्वतःला पेटवले

प्रतिनिधी

नरखेड तालुक्यातील बेलोना ग्राम पंचायत परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईला तेथे घर व गोठे असलेल्यांचा विरोध होता. येथे पथक गोठा तोडायला येताच एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. त्यात तो ७० टक्के भाजल्याने येथे खळबळ उडाली. या अत्यवस्थ तरुणाला नरखेडच्या ग्रामीण रुग्णालयातून नागपुरातील मेयो रुग्णालयात हलवून दाखल केले गेले.

अरविंद रमेश बांबल (३८) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मौजा बेलोना सर्व्हे नं. २३० हा महाराष्ट्र सरकार झुडपी जंगल म्हणून नमुद आहे. येथे जनावरांना उभे राहण्याकरिता अशी नोंद महसूल विभागाकडे आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना ग्राम पंचायत परिसरातील पेठ विभागाच्या वार्ड क्र. ३ येथील जागेवर मागील २५ वर्षापुर्वीपासून सहा ते सात कुटुबांनी अतिक्रमण करुन घरे व जनावरांचे गोठे बांधले.

सदर अतिक्रमणाच्या जागेवर ग्राम पंचायतकडून कर लावून त्याची वसुलीही केली जाते. जखमी अरविंदचे वडील रमेश बांबल यांना सदर ग्राम पंचायतकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी १ वाजता ग्राम पंचायत चमूने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीबी, ट्रॅक्टर घेवून अतिक्रमन स्थळ गाठले. येथे बांबल यांच्या कुटुंबियांनी अतिक्रमणाच्या कारवाईला कडाडून विरोध केला. ही कारवाई केवळ रमेश बांबल यांच्या अतिक्रमाणावरच करण्याचा घाट असल्याचाही आरोप कुटुंबियांनी केला. दरम्यान ग्राम पंचायतच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या भागात कारवाई सुरू केली. हे पथक बांबल यांच्या गोठा पाडण्यासाठी येताच अरविंदने गोठ्यात लपवून ठेवलेले पेट्रोल स्वत:चा अंगावर टाकले. त्यानंतर लगेच त्याने स्वत:ला पेटवून टाकले.

अरविंद आगीत सापडल्याचे बघत तेथे खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांकडून त्याला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु आग विझेपर्यंत अरविंद गंभीररित्या भाजला होता. तातडीने त्याला उपस्थितांकडून जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. येथे प्राथमोपचार करून त्याची प्रकृती गंभीर होत असल्याचे बघत तातडीने त्याला नागपुरातील मेयो रुग्णालयात हलवण्या आले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत रुग्णावर उपचार सुरू आहे. दरम्यान अरविंदने स्वत:ला पेटवल्याचे बघत ग्राम पंचायतची अतिक्रमणविरोधा पथकाने येथून काढला पाय घेतला. परंतु ही कारवाई नियमानुसार असल्याचे ग्राम पंचायतच्या अतिक्रमनविरोधी पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणने होते.

पावसाळयात अतिक्रमण हटवू नये असा शासनाचा नियम आहे. सोबत झुडपी जंगलावरील अतिक्रमण हटविण्याचा अधिकार केवळ वन विभागाला आहे. या जागेशी ग्राम पंचायतचा संबंध येत नाही. त्यानंतरही ग्राम पंचायतकडून कुणाच्या दबावात अतिक्रमण पाडण्याची कारवाई करत आहे? याची चौकशी करून दोषींवर कारवाईची गरज आहे, असा आरोप बांबल कुटुंबियांनी केला.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026