शनिवार दि.३ऑगस्ट २०२४ रोजी लोकनेते, सहकारमहर्षी कै. बाबालाल साहेबराव काकडे दे. यांचा स्मृतिदिन निंबुत येथील बाबा – कमल सभागृहात साजरा करण्यात आला.यावेळी श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.श्री.राजवर्धनदादा शिंदे तसेच निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतिशभैय्या काकडे दे.उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर,मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे. साहेबराव दादा सोसायटीचे व्हाईस चेअरमन मा.श्री. दत्तात्रय काकडे निंबुत केंद्राचे श्री. दगडे साहेब उपस्थित होते.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात कै. सहकार महर्षी बाबांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली,यंदाचे वकृत्व स्पर्धेचे ७ वे वर्ष असून त्या बाबत स्पर्धेचा आढावा सादर केला.बाबांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री. राजवर्धनदादा शिंदे यांनी बाबांच्या आठवणींना उजाळा दिला व बाबांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांची केलेली सेवा या विषयी माहिती दिली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैया काकडे दे. यांनी बाबांच्या बरोबरीने अनुभवलेल्या काही आठवणी सांगितल्या व बाबा हे कशाप्रकारे दानशूर व्यक्तिमत्त्व होतं हे आपल्या अनुभवातून सांगितले.
यावेळी गडदरवाडीचे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झालेले मा.श्री.युवराज बाळासो गडदरे यांचा निंबुत गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बाबांच्या स्मृतिदिनानिमित्त निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात, १ऑगस्ट रोजी, बारामती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा लहान गट व मोठ्या गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण १३ शाळांमधील ६४ स्पर्धकांनी भाग घेतला. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व उत्कृष्ट पद्धतीने सादर केले.
बाबांच्या स्मृती दिना निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
लहान गट
*प्रथम* – प्रसाद उमेश खेडकर
(विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल,सुपे)
*द्वितीय* – अभिनव राजेंद्र निकाळजे.
(कि. एज्युकेशन बाल विकास मंदिर अँड ज्युनियर कॉलेज गुणवडी)
*तृतीय* – खुशी अमित आतार.
(न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी.)
*उत्तेजनार्थ* – कु.आर्या प्रवीण चोरगे
(शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर.)
मोठा गट
*प्रथम* – कु. संस्कृती संजय जगताप.
(नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे.)
*द्वितीय* – कु. समीरा संतोष शेंडकर
(सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर. )
*तृतीय* – कु.बनसोडे ऋतुजा मधूकर
(श्री.बा.सा.काकडे दे. विद्यालय, निंबुत)
*उत्तेजनार्थ* – कु. श्रेया राजेंद्र साळुंके.
(माध्यमिक विद्यालय करंजे सोरटेवाडी)
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात वरील विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे प्राध्यापक मा. श्री.जे. डी.खोमणे,प्राध्यापिका यादव मॅडम,माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी विद्यालयातील शिक्षक मा.श्री.भोसले सर यांनी केला.
कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयातील शिक्षक श्री.पोपट कोळेकर यांनी केले.सूत्रसंचालन श्री. राजाराम भगत यांनी केले व आभार श्री.विजय सूर्यवंशी यांनी मानले.