करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत वाॅर्ङ नंबर 3 शेंङकरवाङी येथे ग्रामपंचायतच्या वतीने सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

माझा जिल्हा

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर परिसरात दिवसा, व रात्री चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.यासाठी करंजेपूल ग्रामपंचायत माध्यमातून कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण शेंङकरवाङी परिसर ,सार्वजनिक ठिकाणे , चौक, रोङ, सी.सी टिव्ही कॅमेर्‍याच्या नियंत्रणात राहणार आहेत.

पोलीस प्रशासन यांना देखील तपासकामात अङीअङचणी येत होत्या.त्या अनुषंगाने करंजेपूल ग्रामपंचायत विध्यमान सरपंच पुजाताई वैभव गायकवाड,

उपसरपंच प्रविण गायकवाड, तंटामुक्त गावसमिती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य निखिल शेंङकर, सौ अरूणा शेंङकर, सौ.सोनल गायकवाड ग्रामसेविका सौ.सुजाता आगवणे यांनी दक्षता घेऊन कॅमेरे बसविण्यात सहकार्य केले.

शेंङकरवाङी परिसर संपूर्ण सी.सी टिव्ही कॅमेर्‍याच्या नियंत्रणात आणल्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वाचे आभार मानले.