• Home
  • माझा जिल्हा
  • यांत्रिकी भवन येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबाराचा १२० महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
Image

यांत्रिकी भवन येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबाराचा १२० महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

प्रतिनिधी

महसूल पंधरवडानिमित्त तहसील कार्यालय व मेहता, मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने यांत्रिकी भवन आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिशचंद्रे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, डॉ. विशाल मेहता, डॉ.निकिता मेहता, डॉ.सानिया मुलानी, डॉ.सौरभ तळेकर, डॉ.सौरभ ढाके, रुग्णालयाचे अमर भोसले उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, प्रत्येकांनी दैनंदिन कामकाज करतांना आरोग्याची काळजी घ्यावी. वाढत्या वयानुसार आरोग्य तपासण्या केल्या पाहिजे. आरोग्य सदृढ राहण्याकरीता नियमित व्यायाम करावा, संतुलित आहार घेतला पाहिजे. या आरोग्य शिबाराचा अधिकारी व कर्मचाऱ्यांना निश्चित लाभ होईल, असे श्री. शिंदे म्हणाले.

श्री.भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी २५ टक्के सवलतीमध्ये सुविधा देण्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.

या तपासणी शिबिराअंतर्गत कर्मचाऱ्यांची रक्तदाब, हृदयासाठी ई.सी.जी. उंची,वजन तपासणी,रक्तातील साखरेची पातळी,शरीरातील ऑक्सिजनची पातळी या तपासण्या मोफत करण्यात आल्या.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026