• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींना बूट-मोजे वाटप .
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींना बूट-मोजे वाटप .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ (मुलींची ) येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेल्या मोफत बूट-मोज्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,‌उपाध्यक्ष, व सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी मधील १२९ विद्यार्थिनींना बूट मोजेंचे व ५० विद्यार्थिनींना मंथन , NSSE परीक्षेचे प्रमाणपत्र व ट्रॉफीचे वाटप करण्यात आले.

याकामी केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड, विस्ताराधिकारी संजय जाधव आणि गटशिक्षणाधिकारी संपत गावडे यांचे सहकार्य लाभले . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी जाधव , मुख्याध्यापिका कविता जाधव , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जीवन राऊत , स्वप्निल शिंदे ,‌ दत्तात्रय घोलप, शमशाद इनामदार , उपशिक्षिका विजया दगडे , लता लोणकर , सुनीता पवार , राणी ताकवले आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, गणवेश यासारख्या योजनेबरोबरच मोफत बूट-सॉक्स मिळाल्यामुळे विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026