प्रतिनिधी – फिरोज भालदार
सध्या परिस्थिती पाहायला गेले तर लहान (अल्पवयीन ) मुले नशेच्या आदी जास्त प्रमाणात होत असताना चित्र आपल्याला दिसत आहे . युवा पिढी हे नशेच्या आदिन झालेले आहेतच यामध्ये आता लहान ( अल्पवयीन ) मुलांची देखील भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे .युवा पिढी , अल्पवयीन मुले नशा करण्यास पसंदी का देत आहेत?
आत्ताच्या परिस्थितीमध्ये वय वर्षे १८ पूर्ण नाही ती मुले देखील मद्यपान (दारू) , चरस , गांजा अश्या अनेक प्रकारच्या नशेला बळी पडतात. यामध्ये मद्यपान ( दारू ) विक्री करणारे दुकानदार देखील त्या मुलांचे वय किती आहे हे चौकशी न करता त्यांना मद्यपान सेवन करण्यासाठी विक्री करतात अश्या दुकानदारांवरती पोलिस प्रशासनाचे खरच लक्ष्य आहे का ?.
ही लहान मुले आणि युवा पिढी जास्त प्रमाणात नशेच्या आदी होत चालले आहेत . नशा करून अल्पवयीन मुले , युवक नशेमध्ये असताना जे मनाला वाटेल ते कृत्य करताना दिसत आहेत . या मुलांना आत्ता सावरले नाही तर मुलांचे पुढील भविष्य कश्याप्रकारे होईल हे त्या मुलांच्या नातेवाईकांनी डोळ्यासमोर आणले पाहिजे . या विषयावरती पोलीस प्रशासनाने मद्यपान ( दारू )विक्री करणाऱ्या दुकानांवरती लक्ष्य ठेवले पाहिजे. अल्पवयीन मुलांना, तरुण पिढीला या व्यसनांपासुन वाचवले पाहिजे .