प्रेरणा शिक्षण संस्थेचे प्रेरणा माध्यमिक विद्यालय वाल्हेकर वाडी येथे क्रांती दिन सोहळा उत्सहात साजरा.!!

माझा जिल्हा

प्रतिनिधी

नऊ ऑगस्ट क्रांती दिन,ज्या देशभक्तांनी,क्रांतिकारकांनी या देशाला स्वतंत्र करण्यासाठी,आपल्या प्राणाची आहुती दिली,त्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस..!!

संस्थेचे आदरणीय संस्थापक श्री.तुकारामभाऊ गुजर आणि सचिव सन्माननीय कांतीलाल दादा गुजर यांच्या प्रेरणेतून प्रेरणा माध्यमिक विद्यालय वाल्हेकरवाडी येथे क्रांतीदिनाचे औचित्य साधून क्रांतिकारकांच्या बद्दलची मनोगते, क्रांतिकारक व देशभक्त यांच्या वेशभूषा व संवाद स्पर्धा, देशभक्तीपर समूहगान स्पर्धा आणि क्रांती रॅली याचे आयोजन केले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. आगम उमेश,पर्यवेक्षक श्री. शेजाळ दादासाहेब, जेष्ठ शिक्षक श्रीम. यशवंते मॅडम, श्री.अनिल नाईकरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.तपासे मॅडम, सौ. जगदाळे मॅडम, श्रीम. कदम मॅडम, सौ. काळोखे मॅडम, श्री. सूळ सर आणि विदयार्थी प्रतिनिधी चि. विपुल आणि कु. वैष्णवी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. काळोखे मॅडम यांनी केले. पर्यवेक्षक शेजाळ सर आणि मुख्याध्यापक डॉ. आगम सर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे आभार श्री. सूळ सर यांनी केले.