• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड .
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी बारामती तालुकास्तरीय योगासन स्पर्धा पार पडल्या. यामध्ये वडगाव निंबाळकर मधील जनता शिक्षण संस्थेच्या स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन खेळाडूंची १७ वर्ष (मुले ) वयोगटातील जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची नियुक्ती करण्यात येते .

यामध्ये स्वातंत्र्यविद्या मंदिर या प्रशालेच्या इयत्ता नववीचे विद्यार्थी ओम संतोष यादव व स्वप्नील रुपेश जाधव या दोघांची निवड या पाच खेळाडूंच्या संघामध्ये करण्यात आली आहे . दोन्ही विद्यार्थ्यांचे जनता शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्रशालेचे प्राचार्य हेमंत तांबे सर ,पर्यवेक्षक हेमंत बगनर सर व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार व अभिनंदन केले. ओम यादव व स्वप्नील जाधव यांना स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेचे क्रीडाशिक्षक संजय झराड सर व निलेश दरेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये सतत खेळ, स्पर्धा परीक्षा , वार्षिक निकाल अशा विविध प्रकारच्या परीक्षेमध्ये , खेळांमध्ये महाविद्यालय अग्रेसर असते . वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व पालकांकडून स्वातंत्र्य विद्या मंदिर या महाविद्यालयाचे कौतुक होत आहे .

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026