प्रतिनिधी
पुणे – येथील ज्ञानाई फाऊंडेशन वतीने प्रा हरि नरके यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन क्रांतीकारक काव्य मैफिल संपन्न झाली
काव्य मैफिलीचे अध्यक्ष कवी किशोर टिळेकर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल उर्दूशायर उध्दव महाजन कवी नानाभाऊ माळी विनोद अष्टुळ प्रा सूर्यकांत नामगुडे संस्थापक अध्यक्ष लोककवी लेखक गीतकार अभिनेते सीताराम नरके यांच्या शुभहस्ते प्रा.हरी नरके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधानाचे पूजन करण्यात आले.
निमंत्रित काव्य मैफिलीची सुरूवात स्वागत गीतने झाली डॉ चारूदत्त नरके यांनी बहारदार दमदार आवाजात गझल सादर केली समाजप्रबोधन घडले पाहिजे असे ते कवितेतून प्रगट विचार मांडला ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांनी त्या महापुरुषांच्या वाटेवरी चालतो नरके सर मी विद्वान मी तुला मानतो असे अभिवादन कवितेतून केले छगन वाघमारे यांनी खुळखूळा ही रचना सादर करून रसिकांची मने जिंकली गायक गीतकार कवी राम सर्वगोड यांनी प्रेम रचना सादर केली काव्य मैफिलची रंगत वाढवली ज्येष्ठ अभिनेते गीतकार जनाबापू पुणेकर यांनी जाताना काय घेवून जाणारे असा महान संदेश देणारी रचना मानवतेला अभिमान वाटावी अशी होती विनोद अष्टुळ यांनी हे आयुष्या तू असा का वागलास ही रचना प्रेरणादायी विचार मांडला नानाभाऊ माळी यांनी भूक नावाची रचना सादर करून उपवासमारीला चपराक वास्तव भाष्य करत शब्द फटकारले मारले डॉ गणेश पुंडे तानाजी शिंदे दिनेश कांबळे दिनेश गायकवाड पांडुरंग म्हस्के विज माने रामदास शेळके सुवर्णा वाघमारे इत्यादी कवी कवयत्रीनी आपल्या रचना सादरीकरण केल्या
अध्यक्षिय भाषणात कवी किशोर टिळेकर म्हणाले समाज प्रबोधन करणारी मार्मिक मार्गदर्शन करणारी थोर मंडळी होवू जातात त्यांचा विचार वारसा आपण जपला तर आपल्या पण जीवनातील विचारांचा आरसा नक्कीच स्वच्छ असेन असेन असे प्रतिपादन करून प्रा हरी नरके यांना अभिवादन केले
अशा या प्रबोधन क्रांतीकारक काव्य मैफिलचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले आभार प्रदर्शन नानाभाऊ माळी यांनी मानले राष्ट्रगीतांनी काव्य मैफिलीची सांगता झाली येथील पुणे नरके पॅलेस मधील ज्ञानाई फाऊंडेशनच्या सभागृहात संपन्न झाला