प्रतिनिधी.
पुणे – येथील ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी उत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त विनोदी विडंबन कवितांची अनोखी काव्य मैफिल नूकतीच संपन्न झाली असून या मैफिलीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध हास्यसम्राट बंडा जोशी प्रमुख पाहुणे दैनिक टोला संपादक लेखक कवी अभिनेते गीतकार नाटककार डॉ बळीराम ओहोळ व एम के जावळे साप्ताहिक आमोद संपादक ज्येष्ठ कविवर्य अशोक भांबुरे ज्येष्ठ कविवर्य जयवंत पवार कविराज विजय सातपुते संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागात गीताने झाली अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व त्यांच्या ग्रंथसंपदांचे पूजन विठ्ठल तरवाल ठाकूर साहेब या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले विनोदी कवितेचे पहिले काव्य पुष्प त्वचारोग तज्ञ डॉ चारू दत्त नरके चारोळ्या विनोदी कवितेने मिश्कीलपणे हसवले कावरा बावरा गीतकार गायक यांनी प्रेमाची रचना ऐकवली कविराज विजय सातपुते यांनी हजल रचना मांडली जयवंत पवार बायोकाचा रूसवा हास्याचे फवारे उडविले सुवर्णा पवार पूर्ती हौस झाली पुरी गीतकार जनाबापू पुणेकर गौराचा नवरा चंद्रकांत जोगदंड हसरी जत्रा सादर केली लोककवी सीताराम नरके यांनी गुलाबी नोट तीचा बोभाटा मिश्कीलपणे मांडत काव्यं मैफिलीत रंग आणला हेमंत केतकर पुण्याची गंमतशीर रचना सादर केली प्रा रंजना घोलप यांनी मोबाईलच्या माध्यमातून दूषपरिणाम होत असून समाज अधोगतीकडे चाललाय ही खंत निर्माण केली.
डॉ बळीराम ओहोळ यांनी
चिंब झाला हदयाचा गाभारा
आयुष्याचा वाजतो नगारा रानकवी जगदीप वनशिव यांनी स्मशान भूमीतील रचना सादर करून विनोदी गंभीर पात्र मांडले असून गझलकार विनोदी कवी अशोक भांबुरे यांनी कार्यकर्त्यांचं भेटीवर भागवा समाज भरकटत चाललय त्यांचे चित्र विनोदी अंगाने मांडले मच्छिंद्र नरके आप्पासाहेब यांनी कॉलेज जीवनातील गंमती जमती सांगून विनोद रचना केली सर्वच कवींना शालेय जीवनातील आठवण करून दिली राम सर्वगोड डॉ गणेश पुंडे तानाजी शिंदे ॲड क्षितीज खरात पांडुरंग म्हस्के विजय माने अनिता आबनावे अशा अनेक कवींनी रचना सादर करून हास्य जत्रेला रंगत आणली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त समावेशक सर्जेराव गाडे मनोगतात म्हणाले प्रत्येक माणसाला जगण्यासाठी छंद जोपासावा नोकरी करताना कवी होणं सोपं नसतं नळाचे पाणी पाहून कवी होता येत नाही खाच खळगे संघर्ष भोगल्या शिवाय कवी होता येत नाही सेवानिवृत्त झाले म्हणजे मेले असे समजून नये चळवळ वळवळ चालू ठेवली पाहिजे खाकी वर्दीतला माणूस कवी होतो तो मला अभिमान वाटतो योगदानाचा मी ही एक धागा आहे लोककवी सीताराम नरके यांच्या विषयी असे प्रतिपादन केले
अध्यक्षिय भाषणात हास्य कल्लोळ करणारे हास्यपंचमीकार हास्यसम्राट बंडा जोशी म्हणाले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे प्रल्हाद केशव अत्रे हे जगप्रसिद्ध माणूस होता.त्यांच्या नावाने आपण सर्व साहित्यिकांनी सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे विशिष्ट विडंबन गीते आचार्यानी केली समाजापुढे एक आदर्श निर्माण करत कला जोपासली असून माणसाला हसण्याचा छंद व्हावा आनंद जीवनात असला कि जगातले सुख मिळते त्याकाळी प्रसिद्ध कवीचे कौतुक व्हायचे अत्रे गुणी होते ज्यांच्या जवळ उत्तम गुण असतात गंभीर कविता लिहिली तर विनोदी कविता लिहिता येते त्याकाळी काही कवी उर्दू हिंदी संस्कृत शब्द आपल्या कवितेत गुंफत असतं त्या काळी अशा कवीची थट्टा व्हायची कवीला चातुर्य असलं पाहिजे विनोद कविता ही गंभीर पणे सादर करावी लागते अत्रे एक प्रेरणाशक्ती विनोदी ध्यास अन् महामहीम हरहुन्नरी माणूस होते अशी महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजणारे कवी आहेत आपण सर्व जण हास्य वंदना देण्यास आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद मानतो असा आशावाद मांडत त्यांची महाराष्ट्रभर गाजत असणारी विनोदी राजकीय पाळणा सादर करू रसिकांची मने जिंकली मंत्र मुग्ध वातावरण तन मन प्रफुल्लित झाली या अनोख्या विनोदी ज्ञानी माणसांनी आपल्याच कर्तृत्वाचा ठसा उमटवला
अशा या विनोदी विडंबन कवितांची सुरैल मैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार दमदार आवाजात शीघ्रशैलीत चारोळ्या विनोदी चुटके शेरोशायरी विनोदी रूबाया सादर करू रसिक मायबाप मान्यवरांची मने जिंकली कार्यक्रम आभार प्रदर्शन मच्छिंद्र नरके म्हणाले मी सर्व कवीच्या ऋणानुबंधनात राहू इच्छितो भारत माता की जय घोषणा करत काव्य मैफिलीची सांगता करण्यात आली पुणे नरके पॅलेस मधील ज्ञानाई फाऊंडेशनच्या सभागृहात आचार्य अत्रे यांची जयंती साजरी करण्यात आली