निंबुत येथे बा.सा.काकडे विद्यालय व प्राथमिक शाळा येथे ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Uncategorized

प्रतिनिधी.

देशभरामध्ये आज ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आनंद उत्सव करण्यात आला. याचबरोबर निंबूत येथे देखील बा.सा. काकडे विद्यालय येथे ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक जी सोनटक्के हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नींबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप काकडे, सोमेश्वर चे विद्यमान संचालक अभिजीत राव काकडे, शाबुद्दीन भाई सय्यद व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत येथे सरपंच निर्मलाताई काळे, उपसरपंच अमरदीप काकडे, सदस्य नंदकुमार काकडे, प्रमोद बनसोडे, विद्याताई काकडे, कुमोदिनीताई काकडे,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून प्रभात फेरी काढून भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देण्यात आल्या,. यावेळी दोन्हीही शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आस सुरुवातीलाच शाळेच्या प्रगतीचा आलेख मुख्याध्यापिका दिपाली रणवरे यांनी सर्वांसमोर मांडला. तर आभार विजय सूर्यवंशी सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते