बारामती ! वडगाव निंबाळकर येथे जि. प . प्राथमीक शाळा नंबर १ व २ मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ व २ येथे ग्रामपंचायतचे सदस्य अजित भोसले , प्रमोद किर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत राव पानसरे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राहुल जाधव, तानाजी जाधव, उपाध्यक्ष जीवन राऊत ,सदस्य मंगेश गायकवाड,मोहिनी दीक्षित, आनंद खोमणे, समीर आतार,स्वप्नील शिंदे,अनिल खुडे,मनोज घोलप,राहुल हिरवे,दत्तात्रय घोलप,अमर साळवे,सेवानिवृत्त शिक्षक शिलवंत गुरुजी , महेश राऊत, सौ. मदने ताई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व,चित्रकला स्पर्धा , मेहंदी व मंथन शिष्यवृत्ती परिक्षामधील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.तसेच सचिन आर्ट्स नऊफाटा यांच्या सौजन्याने प्रथमेश महेश गाढवे,रुद्र दत्तात्रय खुडे,जयदीप शेखर खोमणे,सार्थक राहुल जाधव , संस्कृती उमेश शिंदे, रूपाली सत्यपाल साळवे ,अनन्या संजय साळवे , स्नेहा सचिन दरेकर , आहाना मोसीम कोरबू , आरोही राहुल दरेकर , वैष्णवी पांडुरंग हिरवे , ज्ञानेश्वरी प्रमोद किर्वे या विद्यार्थ्यांना आदर्श गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरवचिन्ह देण्यात आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त रुद्र खोमणे,ओम मोरे,आर्यन गवळी,युगांत निंबाळकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम् अश्या घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली .मुख्याध्यापिका कविता जाधव, अरुणा आगम , शिक्षक , शिक्षिका, पालक , ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवळी , राणी ताकवले यांनी तर आभार मालन बोडरे यांनी मानले.