प्रतिनिधी – फिरोज भालदार
आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्यदिना दिवशीच इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीविरुद्ध वालचंदनगर या ठिकाणी प्रवीण अंकुश साळुंखे व अमोल धरेप्पा कोटगोंड यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कंपनीविरुद्ध आमरण उपोषणाला बसले आहेत .
मिळालेल्या माहितीनुसार –
वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये कामगार काम करत आहेत . या कंपनीने कामगारांचा मासिक वेतन वेळेत न देणे , थकीत वेतन व थकीत देनी आहे ते न मिळणे , वेतन करण्यास विलंब होणे , कामगार मंत्रालयात झालेले मिनिट्स न पाळणे व युनियन कडून वेळ काढूनपणा व दिशाभूल व फसवणूक होणे बाबत हे आमरण उपोषण प्रवीण साळुंखे व अमोल कोटगोंड यांनी केले आहे .
वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून कामगारांची अशीच वारंवार पिळवणूक व फसवणूक होत असते असे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे . या कंपनीमध्ये काम करणारे हे आपली उपजीविका भागवण्यासाठी काम करत असतात मात्र या कंपनीकडून कामगारांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष्य होत आहे . या कंपनीमध्ये कामगार हे या कंपनीसाठी रात्रंदिवस काम करत असतात मात्र त्यांना त्यांच्या कामाची किंमत ही वेळेत मिळत नसल्याने त्यांची उपजीविका कशी होणार ?.
त्यांच्या मुलांचे शिक्षण , घरातले रेशनिंग यासाठी हे पैसे आणार कुठून ? या कंपनीमध्ये काम करणारे कामगारांना आता उपाशी मरण्याची वेळ आली आहे तरी या कंपनीच्या कामगारांसाठी ही कंपनी लवकरात लवकर मार्ग काढणार का?. वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने लवकरात लवकर कामगारांचे मासिक वेतन वेळेवर व्हावे व थकीत वेतन मिळावे व उपोषणामधील सर्व मागण्या मंजूर कराव्यात म्हणून प्रवीण साळुंखे व अमोल कोटगोंड यांनी कामगार यांच्या सोयीसुविधा व न्याय हक्कासाठी आमरण उपोषण केले आहे .