श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार कार्यक्रमाचे आयोजन

माझा जिल्हा

प्रतिनिधि

    दापोडी, पुणे येथील सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० ते१२:०० यावेळीत “श्रमसंस्कार उपक्रमाचे”(परिसर स्वच्छता) आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी, श्रमाचे महत्त्व त्यांना कळावे, कोणतेही काम करण्याची मनाची तयारी व्हावी, कामाची सवय लागावी, कष्टाच्या कामाला कमी न समजण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त परिसर स्वच्छता व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      श्रमसंस्कार कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व याविषयी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्यक्ष श्रमदान करण्यात आले.

     विद्यार्थ्यांनी खोरी, घमेली, खुरपी, विळे, झाडू, खराटे, कुदळ, यासारखी साहित्य बरोबर घेऊन दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या आवारातील विविध शाखाचा परिसर स्वच्छ अतिशय उत्साहात स्वच्छ केला.

     परिसर स्वच्छता करताना झाड लोट करून केरकचरा जमा करणे, गाजर गवत काढणे, प्लास्टिक निर्मूलन, आदि कामे करण्यात आली.

     या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे ६० पेक्षा अधिक विद्यार्थी व सर्व प्राध्यापक सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे, प्रा.सिद्धार्थ कांबळे, डॉ. अंकुश काळे, प्रा. वैभव भालेराव प्रा. ज्योती लेकुले, प्रा. चंद्रभागा उघडे, यांनी केले.

      कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी, डॉ. सोमनाथ दडस, डॉ. शोभा शिंदे, प्रा .सुरेखा हरपुडे, डॉ .उत्तम गोरड, प्रा. अमरदीप गुरमे, प्रा.प्रितेश पठारे, प्रा. मडावी किरण, प्रा.रोहिणी वाणी, प्रा. महेंद्र शिंदे, प्रा. शेळके ऋतुजा, प्रा. शीला येलमेली, प्रा. मोरे रूपा, प्रा.किशोर मुठेकर, प्रा.शिंदे प्रियांका, प्रा.कारभारी संतोष, डॉ. मोमीन समीना, प्रा.नानकर हेमांगी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

    कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. “वंदे मातरम !”गीताने कार्यक्रमाची सांगता झाली .