प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात शनिवार दिनांक १७/०८/२०२४रोजी सकाळी ९.०० वा.रक्षाबंधन या सणाच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांनी माती पासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे व माती कामाचे कौतुक केले.
या उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे प्रदर्शन पाहण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
रक्षाबंधन निमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या या राख्या उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी येथील विद्यार्थ्यांना बांधण्यासाठी आश्रमशाळेत पाठविण्यात आल्या…राखी प्रदर्शन व मातीकाम प्रदर्शन या कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयातील शिक्षक श्री. जाधव सर व श्री फरांदे सर यांनी केले.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सतीशभैय्या काकडे दे. उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे सर व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे. यांनी शुभेच्छा दिल्या.