बारामती ! स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेचे घवघवीत यश –

Uncategorized

प्रतिनिधी –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे सन 2023 – 24 अंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा मधून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून शाळेला यश मिळाले . 2023 – 24 अंतर्गत शाळेमध्ये माता पालक, शिक्षक पालक संघामधून गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवननाथ सर, उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे ,सौ मनिषा चव्हाण सर्व शिक्षकांच्या प्रयत्नांमधून पालकांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांत स्पर्धा परिक्षेची संधी निर्माण करून दिल्याने विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा मधून राज्य, जिल्हा, तालुका , केंद्र गुणवत्ता यादीत अव्वल ठरण्यास यशस्वी झाले आहेत .

प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांमध्ये बालवयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, आवड निर्माण व्हावी ,विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने विविध परीक्षांचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती सभा मधून मान्यता घेऊन करण्यात आले होते .यामध्ये मंथन स्पर्धा परीक्षा, भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा Itse, ओलंपियाड एमटीएस, बीटीएस परीक्षा ,डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा, इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा अशा विविध स्पर्धेमधून पालक परवानगीवरून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .

सदर परीक्षांमध्ये इ १ ली ते ४ थी पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले देवराज खलाटे, अद्वय घोरपडे, स्मायली घोरपडे, आदित्य कुंभार , खुशी धोत्रे, शरण्या तांबे ,अल्फीया शेख, श्वेता वाघमारे , विराज उकिरडे , वेदांत जगताप ,प्रबुद्ध साळवे, अथर्व धोत्रे ,स्वरा शिंदे,अंकिता वाघमारे ,श्रेया नरुटे, अन्वेष चव्हाण ,दिव्या वाघमारे, प्रियदर्शनी शिंदे आराध्या गायकवाड , प्रणित धुमाळ , आरोही खुडे, आयुष लांडगे, तृप्ती जगताप,वैभवी घोरपडे, शिवण्या काकडे , अंकिता वाघमारे , ऋतुजा सरडे ,कशिश पवार , शाहीद शेख , आजाण शेख, विवेक खरात, शिवम खलाटे ,पियुष इंगळे ,जकीया शेख ,किमया खलाटे स्वराली खलाटे ,श्रेयस तांबे, प्रियदर्शनी शिंदे ,वैभवी धोत्रे ,श्रीतेज चव्हाण, आल्फिया शेख वरील सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले प्राथमिक स्तरावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जवाहर नवोदय सैनिक स्कूल आदी विविध स्पर्धा परीक्षांची पायाभरणी करण्याचे काम शाळेतील शिक्षक करत असले बद्दल सरपंच सौ. मंदाकिनी कानडे, उपसरपंच श्री गिरीश खलाटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ दिपाली खलाटे, सर्व सदस्य, ग्रामस्थ पालक पदाधिकारी यांनी विद्यार्थांच्या यशाबद्दल विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले .