बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे चिरंजीव, युवा नेते पार्थ दादा पवार यांनी ऊर्जा भवन येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करून शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, ऍड. आकाश दामोदरे, आणि भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा. श्री. आकाश दामोदरे यांच्यासह उपोषणकर्त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
पार्थ पवार यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शिष्टमंडळ चर्चेसाठी लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच डोपिंग चाचणी तात्काळ करण्याचे आश्वासन तसेच बारामती उप प्रादेशिक परिवहन यांची तात्काळ भेट घेण्याच्या आश्वासन युवा नेते पार्थ दादा पवार यांनी दिले.
त्यांनी या विषयांचे तात्काळ निराकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या ठाम आश्वासनाने उपोषणकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पार्थ पवार यांनी या उपक्रमाला आपला संपूर्ण प्रतिसाद दर्शवला आहे.
या भेटीमुळे उपोषणकर्त्यांमध्ये आशा निर्माण झाली असून, तात्काळ न्याय मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.