*मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद*

Uncategorized

*सोमेश्वरनगर* – महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचलनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे,संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचर्य प्रा.जयश्री सणस, पर्यवेक्षक आर.बी गोलांदे, महविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.सुजाता भोईटे यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
*यशस्वी खेळाडू विद्यार्थी खालील प्रमाणे-*
१) सय्यद अली रियाज-प्रथम क्रमांक
(खुलागट) १९वर्ष वयोगट
२) पिंगळे सौरभ-प्रथम क्रमांक
(ग्रीको रोमन,१९वर्ष वयोगट ५५किलो वजनगट)
३) गोंजारी संग्राम-प्रथम क्रमांक
(१७वर्ष वयोगट, ९२किलो वजनगट)
४) कोळपे प्रथमेश बापूराव- प्रथम क्रमांक
(१९वर्ष वयोगट, ६५किलो वजनगट)
५) भंडलकर आयुष् तानाजी -प्रथम क्रमांक
(१९वर्ष वयोगट, ७९किलो वजनगट)
६) शंभूराज साळुंखे -तृतीय क्रमांक
(१९ वर्ष वयोगट ६१ किलो वयोगट)
७) कर्चे जय सुनील -प्रथम क्रमांक
(१७वर्ष ९२किलो वजन गट)
८) रणवरे सार्थक -द्वितीय क्रमांक
(१७वर्ष, ६०किलो वजन गट)
९) ठोंबरे समर्था तानाजी -प्रथम क्रमांक
(१७ वर्ष वयोगट,५०किलो वजन गट)
१०) *जगताप काजल हनुमंत-द्वितीय क्रमांक (१९वर्ष, ५०किलो वजन गट)*
११) ताकवले स्वराज- द्वितीय क्रमांक
(१७ वर्षवयोगट, ५०किलो वजन गट)
१२) हाके गणेश-द्वितीय क्रमांक
(१७वर्ष वयोगट, ४८किलो वजन गट)
१३) पवार आदित्य-प्रथम क्रमांक
(१९वर्ष वयोगट,६०किलो वजन गट)
१४) केसकर हर्षद-द्वितीय क्रमांक
(१९वर्ष वयोगट, ५५किलो वयोगट)
१५) शिंदे आर्य विलास-प्रथम क्रमांक
(१९वर्ष वयोगट ७४किलो वजन गट)
१६) *प्रथमेश चाबुकस्वार-तृतीय क्रमांक (ग्रिकी १९वर्ष वयोगट, ५०किलो वयोगट)*
१७) कोळेकर सुरज- तृतीय क्रमांक
(१७वर्ष वयोगट ४५किलो वजन गट)

*यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.*