प्रतिनिधी –
पंचक्रोशी प्रकाशन मंडळाची दिपावली काव्य मैफील ( समेलंन ) निमित्त बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे नुकतीच मिटिंग पार पडली. सालाबाद प्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय काव्य समेलंन दिपावलीचे सुट्टीत आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात आले . या वर्षी समेलंन स्थळ अष्टविनायकांपैकी पहीला गणपती मोरया मोरेश्वर अर्थात पवित्र तिर्थक्षेत्र मोरगाव येथे निश्चित करण्यात आले आहे.
असे दिपावली काव्य मैफील २०२४ चे अध्यक्ष सुप्रसिद्ध रानकवी सोमनाथ सुतार यांनी स्पष्ट केले. पंचक्रोशी प्रकाशन मंडळाचे सर्वच कार्यक्रम विनामुल्य व नवोदीतासाठी अग्रक्रमाने व्यासपिठ वर्षातुन दोनदा ऊपलब्ध करत असतात. यामध्ये पाहिले दिपावली व दुसरे ८ मार्च महीला दिनाचे निमित्त आयोजित करण्यात येत असते.
या वेळी मंडळातील कविवर्य संतोष झगडे , पंचक्रोशी चे वीरप्पन भोसले, सुभाष वाघमारे, म.सा.प चे युवराज खलाटे , गझलकार प्रमोद जगताप , आदी पदाधिकारी ऊपस्थीत होते. सचीवांनी उपस्थित सर्वाचे आभार मानून मीटिंगची सांगता झाली .