• Home
  • माझा जिल्हा
  • वीर धरण विसर्ग:महत्त्वाची सूचना. निरा नदीपात्रामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू.
Image

वीर धरण विसर्ग:महत्त्वाची सूचना. निरा नदीपात्रामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू.

संपादक मधुकर बनसोडे

आज दिनांक २७/०८/२०२४ रोजी वीर धरण १००% भरलेले असून पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.भाटघर धरण ,निरा देवघर व गुंजवणी धरणातून सांडव्यावरून तसेच विद्युत गृहाद्वारे येणाऱ्या विसर्गात वाढ होत आहे तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊसाच प्रमाण वाढत आहे त्यामूळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक २७/०८/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्याच्या अतीवाहका द्वारे ३५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेऊन निरा उजव्या कालव्याच्या अतीवाहकाद्वारे १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ५३८४७ क्यसेक्स विसर्गामध्ये वाढ करून ६१९२३ क्यसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात येत आहे.आता *निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग ६३२७३ क्युसेक्स असणार आहे.*
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.याद्वारे विनंती करण्यात येते कि,नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी.

*-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग,फलटण,जिल्हा सातारा*

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026