प्रतिनिधी.
खेड तालुक्यातील काळुस येथील बेकायदेशीर पुनर्वसन बाधित शेतकरी व सेझ बाधित शेतकरी यांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांचा भव्य असासत्कार करण्यात आला.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ रयत क्रांती संघटना ताकतीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पुणे येथे पार पडली. या बैठकीस राज्यभरातील विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर विचार मंथन करण्यासाठी भविष्यात कार्यकर्त्यांची “अभ्यास शिबिरे” देखील आयोजित करण्याच निर्णय घेण्यात आला.
विधान परिषदेवर नुकतेच आमदार म्हणून निवडून गेल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचा खेड तालुक्यातील काळूस येथील बेकादेशीर पुनर्वसन बाधित शेतकरी आणि सेझ बाधित शेतकरी यांच्यावतीने करण्यात आला. सदाभाऊ खोत यांच्याबरोबर काळुस येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणा संदर्भातील प्रश्न, खेड सेझ 15% परतावा प्रश्न यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
राज्य कार्यकारणीत अनेक महत्त्वाचे ठराव झाले.
१) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.
२) साखरेचा हमीभाव 38 रुपये करण्यात यावा.
३) शासनाकडून सोयाबीनला उप्तादन खर्चावर आधारित ७ हजार आणि कापसाला १० हजार हमीभाव देण्यात यावा.
४) सन २०२३-२४ चा पिक विमा देण्यात यावा.
५) वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानातून तार कुंपण द्यावे.
६) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून (MREGS) शेतीची कामे घेण्यात यावीत.
७) शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेकडून तपासण्यात येणारे सिबिल (कर्ज पात्रता) रद्द करण्यात यावे.
८) कांद्यावरील निर्यात शुल्क काढण्यात यावे.
९) शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठावण्यात यावी.
१०) आवश्यकता नसताना शेतमाल आयात करू नये.
११)रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान देण्यात यावे.
१२) शेतात लागणारी शेती अवजारे, बी बियाणे, खत यावर लागणारी GST माफ करण्यात यावी.
१३) निलंगा, जि. लातूर / माढा जि. सोलापूर / खेड आळंदी जि. पुणे / वरुड मोर्शी जि. अमरावती / मेहकर जि. बुलढाणा / वाळवा जि. सांगली हे सहा मतदार संघ “रयत क्रांती पक्ष” मोठ्या ताकदीने लढवणार आहे.
खेड आळंदी मतदारसंघात रयत क्रांती संघटना मोठ्या ताकदीने विधान सभा निवडणूक लढणार असे सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. खेड तालुक्यासाठी रयत क्रांती संघटनेकडून अनेक जण इच्छुक असून अंतिमता सदाभाऊ खोत उमेदवार ठरवतील.