काळूस ता. खेड येथील शेतकऱ्यांच्या बेमुदतअमरण उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी व उपचार न घेण्याचा घेतला निर्णय!

Uncategorized

आंदोलनात सलग १६दिवस पूर्ण
उपोषणकर्त्यांची आरोग्यविषयक स्थिती बनली गंभीर!
गावकऱ्यांमध्ये शासनाच्या उदासीनते बाबत असंतोषाचे वातावरण
आंदोलन तीव्र करण्याचा पोषणकर्त्यांचा निर्धार
काळूस ता .खेड जि. पुणे येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर बेकायदा पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढून सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी १५ऑगस्ट २०२४ पासून पुनर्वसन बाधित शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला सलग१६ दिवस पूर्ण झाले आहेत .उपोषणकर्त्यांची आरोग्य विषयक स्थिती अत्यंत गंभीर बनली उपोषणकर्त्यांची वजने १०किलो पर्यंत कमी झाली आहेत. काही उपोषणकर्त्यांची अतिशय क्रिटिकल कंडिशन आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपचार /तपासणी घेण्यास नकार दिला असूनआम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिकाच आंदोलन कर्त्यांनी घेतलेली आहे. प्रशासनाने/ शासनाने दोन दिवसात या प्रश्न संदर्भात निर्णय घ्यावा. अशी उपोषणकर्त्यांची अपेक्षा आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर बनून आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्यात येईल असा इशाराही दिला आहे.