प्रतिनिधी.
खरंतर कोविड ने वृक्षारोपणाचे महत्त्व काय आहे हे जगाला दाखवून दिले आहे वृक्ष जगवले पाहिजेत हे 2019 मध्ये दाखवून दिलं आहे त्याच अनुषंगाने नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपणामध्ये जवळपास दहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करण्यात आली गेल्या अनेक महिन्याभरापासून निंबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविले जात आहेत आजच्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जुबिलंट कंपनीचे इसाक मुजावर साहेब, ढगे साहेब, सायली मॅडम, निंबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप काकडे, नंदकुमार काकडे, ग्रामसेवक काळभोर, क्लार्क भाऊसो कोळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, मुख्याध्यापक बालगुडे मॅडम, शेंडकर मॅडम, अनपट सर आदी मान्यवर उपस्थित होते, लावलेली सर्व झाडे भविष्यात त्याचं वटवृक्षात रूपांतर आम्ही करू असे आश्वासन अनपट सर यांनी दिले.
तर इसाक मुजावर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कंपनी नेहमीच चांगल्या उपक्रमांमध्ये शाळेच्या बरोबर असेल असे आश्वस्त केले.