प्रा. आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांना संरक्षण सामरिक शास्त्र विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान*

Uncategorized

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मानव विद्या शाखेंतर्गत सोमेश्वर नगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयातील प्रा. आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांना संरक्षण व सामारिक शास्त्र विषयात पीएचडी पदवी डॉ.दिलीप मोहिते, डॉ.एम. एल. साळी, डॉ. विजय खरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
प्राध्यापक आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांनी “शीतयुद्धोत्तर कालखंडातील (१९९० ते २०१०) भारताचे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या कार्याचा एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर शोध प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर केला.
त्यांच्या शोध प्रबंधाला अंतिम मूल्यमापनाच्या समितीचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ एम एल साळी, तर बहि: स्थ परीक्षक महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता मा. प्राचार्य डॉ. दिलीप मोहिते सर यांनी मूल्यांकन केले.
प्रा. आदिनाथ लोंढे यांना मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ. विजय खरे (विभागप्रमुख, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) यांनी काम पाहिले.
प्राध्यापक आदिनाथ लोंढे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश भैय्या काकडे देशमुख महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री अभिजीत भैया काकडे देशमुख संस्थेच्या सचिव श्री सतीश लकडे सर तसेच संचालक मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जयश्री सणस,पर्यवेक्षक प्रा. राहुल गोलांडे , प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, ग्रंथालय कर्मचारी, सर्व विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.