बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

आज श्री गणेशाचे आगमन होत असल्याने वडगाव निंबाळकर येथील मुख्य बाजारपेठ गणेश मूर्ती विक्रेत्यांमुळे फुललेली दिसत होती. वडगाव निंबाळकर बाजार पेठ मोठी असल्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दोन दिवस आगोदर गणेश मूर्तीचे स्टॉल लागले होते . यावर्षी अधिकचां पाऊस काळ असल्यामुळे शेतात तरकारी पिकांसह बाजरी ऊस चांगलेच भरलेले आहे त्यामुळे बळीराजा सुखावलेला असल्यामुळे यंदा गणेश मूर्ती व गौरी गणपती आरास साठी मनसोक्त खरेदी करताना दिसत होते .

तसेच मूर्ती खरेदी करण्यासाठी होळ , सस्तेवाडी , सदोबाची वाडी , कोऱ्हाळे खुर्द, जायपत्रे वाडी, दरेकर मळा, परांडे मळा, व वडगाव निंबाळकर,तसेच अनेक ठिकाणाहून वडगाव निंबाळकर ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे गणेश मूर्ती घेण्यासाठी येत असतात . दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलचे प्रमाण ज्यास्तीचे असल्याने वाडगाव निंबाळकर बाजारपेठ मोठ्या संख्येने भरगच्च दिसत होती . बाजारपेठेत आलेल्या मुर्त्यांमध्ये लालबागचाराजा, दगडूशेठ व विविध आसनावरील श्री गणेशाच्या मूर्तीची घरगुती साठी मागणी बाजारपेठेत जास्त दिसत आहे .