श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा..*

Uncategorized

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाने झाली.या प्रदर्शनाचे उद्घाटन दैनिक सकाळचे जेष्ठ पत्रकार माननीय श्री संतोष शेंडकर आणि संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री.भीमराव बनसोडे सर यांच्या शुभहस्ते झाले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेमध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती आणि शिक्षक दिनाविषयी माहिती सांगितली. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्ताने विद्यालयात अध्यापनाचे काम केले यावेळी त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितले.यामध्ये इयत्ता दहावीतील कृतिका विनोद धुमाळ अपेक्षा राजेंद्र लकडे अमेय सतीश करे या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. तसेच इयत्ता नववीतील प्रेमराज भंडलकर या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे मा. श्री.संतोष शेंडकर ज्येष्ठ पत्रकार दैनिक सकाळ सोमेश्वर नगर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्राचीन काळातील शिक्षण पद्धती व आताच्या काळातील शिक्षण पद्धती यामध्ये झालेला बदल हे अनेक अनुभवातून सांगितले व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांचे शिक्षणातील योगदान याविषयी माहिती सांगून, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांना गोष्टीतून जीवन कौशल्य मूल्य समजावून दिली. प्रश्न विचारा प्रश्न विचारा …असेच का? अन तसेच का? हा मंत्र विद्यार्थ्यांनी सतत उराशी बाळगला पाहिजे असे आपल्या संवादातून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. भीमराव बनसोडे सर यांनी शिक्षक दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन, शिक्षकांना बदलत्या शिक्षण प्रणालीचे महत्व जाणून घेतले पाहिजे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कु.मानसी माने हीने केले व आभार कु. ज्ञानेश्वरी वाकूडे हीने मानले.
५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे.व मानद सचिव मा.श्री. मदनराव काकडे दे.यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.