राम सर्वगोड यांस लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार प्रदान

Uncategorized

प्रतिनिधी
सांगोला – येथे लोकशिक्षण बाबा भारती प्रतिष्ठान पुणे संस्थेच्या वतीने यावर्षीचा लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार कवी लेखक गायक राम सर्वगोड यांना प्रदान करण्यात आला
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कवी राम सर्वगोड यांच्या काव्य साहित्यास पुरस्कार देवून गौरविण्यात आले
समाजात भेडसवणारे प्रश्न काव्यातून मांडणारे प्रबोधन क्रांतीकारक विचार मांडणे वैचारिक मंथन करत समाज सेवा करणारे कवी समाजाचं देणं असतं पुरस्कार स्वीकारताना सर्व गोड म्हणाले कविता जगताना आत्मिक समाधान मिळते विचार धन हे समाजाचे देणं असून वास्तवाचे भान समजले कि वास्तव दर्शन घडते आपुलकी निर्माण होत जाते माणुसकी जिव्हाळा जपत असताना जगण्याची उर्मी उर्जा कवितेतून मिळते असा आशावाद व्यक्त केला
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक लेखक समीक्षक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव माणदेश कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे कविराज अनिल केंगार जिंदा दिल कवी गौसपाक मुलाणी गायक कवी छगन वाघचौरे रूपेश आल्हाट माजी डी राज सर्वगोड सुनिल सर्वगोड प्रविण मदन देगावकर भगवान धाईजे माने निमिष भारती संस्थापक अध्यक्ष महेंद्र भारती पुरूषोत्तम सदाफुले प्रा प्रभाकर दाभाडे शाहीर प्रभाकर वाघोले अरूण खराडे विनोद हरिभाऊ प्रक्षाळे श्रीधर वडदकर जयश्री श्रीखंडे कोकाटे विनोद धुमाळ असे मान्यवर उपस्थित होते