सोमेश्वर ची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची सभासदांमधून चर्चा.!

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी कारखाना कार्यस्थळावरती दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. मात्र ही सभा अनेक विषयांमुळे वादळी होणार असल्याची चर्चा सध्या सोमेश्वर च्या सभासदांमधून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने 2023/ 24 च्या गळीत हंगामामध्ये सभासदांच्या ऊस तोडीसाठी झालेला विलंब. ऊसतोड उशिरा झाल्यामुळे सभासदांचे एकरी जवळपास 15 टन ऊस वजन घट झाली आहे अशी चर्चा सभासदांमध्ये होत आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा आहे की गेटकींनचा आहे या प्रश्नावर ती मोठा गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही? याचबरोबर सभासदांना दिवाळी करता दिली जाणारी साखर 50 किलो मिळावी ही मागणी देखील मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे चित्र सध्या परिसरातील सभासदांमधून बोलले जात आहे.
संचालक मंडळ मोरासिस अभ्यास दौऱ्यामधून नक्की कशाचं प्रशिक्षण घेऊन आले नक्की त्या ठिकाणी कोणता अभ्यास केला, खरंच सभासदांच्या पैशावरती संचालक मंडळ त्या ठिकाणी अभ्यास दौरा करण्यासाठी गेले होते का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये होऊ शकतो अशी देखील चर्चा सभासदांमधून होत आहे.  अभ्यास दौऱ्या दरम्यान काही संचालकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून समुद्रातील बोटिंग चे, हॉटेलचे असे विविध फोटो व्हायरल केले गेले खरंच हे फोटो वायरल करण्याची गरज होती का या व्हायरल झालेल्या फोटोंवर ती देखील चर्चा होणार का? सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व विषयांवरती समाधानकारक चर्चा होणार का असा देखील प्रश्न यावेळी सभासदांमधून उपस्थित केला जात आहे. सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाला माननीय अध्यक्षांकडून उत्तर मिळणार का? अशी देखील चर्चा सभासदांमधून होत आहे. सोमेश्वर ची वार्षिक सर्वसाधारण सभा एक वाजता जरी चालू होत असली तरी सुरुवातीला अध्यक्ष यांचे मनोगत,सत्कार. यामध्ये मोठा वेळ जातो व त्यामुळे बाहेर गावाहून आलेले सभासद यांना ऐन वेळच्या विषयामध्ये सहभाग घेता येत नाही त्यामुळे रात्री नऊ वाजता सभा थांबवून राहिलेली सभा दुसऱ्या दिवशी घ्यावी अशी देखील मागणी काही सभासद सभेमध्ये करणार असल्याची चर्चा होत आहे.
दरवर्षी शिक्षण निधी कापला जातो मात्र सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खरंच योग्य दिशेने वाटचाल करीत आहे का? या विषयावरती देखील मोठी चर्चा सभासदांमधून होत आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चांगल्या स्थितीमध्ये असल्याचे बोलले जात आहे मग सभासदांच्या ऊस बिलातून एकही रुपया कारखान्याने कपात करू नये अशी देखील मागणी सभासद वर्गांमधून होत आहे.
या एक ना अनेक कारणांमुळे सोमेश्वर ची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार असल्याची चर्चा सध्या सभासदांमधून होत आहे.