सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवरती पावसाचे संकट येणार का.?

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

आज दुपारी एक वाजता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. मात्र हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित केला आहे आज सकाळीच पावसाला थोड्या प्रमाणात सुरुवात देखील झाली होती. सूर्य देवाचे सकाळपासून दर्शन झालेले नाही मात्र आज सकाळपासूनच ढग दाटून आले आहेत. जर सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेस पावसाला सुरुवात झाली तर सोमेश्वर ची सभा होणार का? की आलेल्या पावसाचा फायदा घेत सोमेश्वर चे कारभारी मग कोणतीही चर्चा न करता मंजूर मंजूर चा जयघोष करीत सभा उरकून घेणार अशी चर्चा सभासदांमधून होत आहे.
कोणत्या विषयांना मंजुरी द्यायला हवी कोणत्या विषयांवर ती सखोल चर्चा व्हायला हवी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून कालपासून सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचे विषय आहेत. त्यामुळे पाऊस आला तर या विषयांवर ती चर्चा होणार का? की पावसामुळे सभा तहकूब करून पुढे ढकलली जाणार.