• Home
  • माझा जिल्हा
  • आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त नगरपरिषदेत प्रशिक्षण संपन्न.
Image

आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त नगरपरिषदेत प्रशिक्षण संपन्न.

बारामती, दि. २७: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशान्वये आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त आज बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यालय अधीक्षक अश्विनी अडसूळ, ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्‍यक्ष अब्राहाम आढाव, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विविध सामाजिक संस्‍थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. आढाव यांनी माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत असलेल्या विविध तरतुदी, त्‍याचा वापर आदी बाबाबत माहिती दिली. यावेळी माहितीचा अधिकार अर्ज करताना येणाऱ्या अडचणी, अर्जांना द्यावयाची उत्‍तरे याबाबत शंकाचे निरसन करण्यात आले.

नगर परिषदेच्यावतीने ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ पंधरवडाअंतर्गत यावर्षी ‘स्‍वभाव स्‍वच्‍छता –संस्‍कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त सामुहिक स्‍वच्‍छता शपथही यावेळी देण्‍यात आली.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026