सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिगर सभासद कामगार घरी बसवण्याबाबत झालेल्या सभासदांच्या सूचनेचे कारखाना प्रशासनाकडून पालन केले जाणार का.

माझा जिल्हा

 संपादक मधुकर बनसोडे.

 मागील काही दिवसापूर्वीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमेश्वर नगर येथे पार पडली सर्व विषयांवर ती सभासदांकडून सखोल चर्चा करण्यात आली या सभेचे अध्यक्ष श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देत लोकशाही पद्धतीने सभेचे कामकाज पार पाडले.

 मात्र याच सभेमध्ये सोमेश्वर कारखान्यामध्ये झालेल्या कामगार भरती वरती मोठ्या प्रमाणात गैर कारभार झाला असल्याचे काही सभासदांनी आपले मत व्यक्त केले.

 ज्या गावाला संचालकच नाही त्या गावातील सभासदांच्या मुलांना रोजगार मिळणार का अशी देखील चर्चा सभासदांनी या सभेमध्ये केली.

 तर काही संचालकांनी ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्याच भावकीतील घरातील मुलांना नोकरी मिळवून दिल्याचे सभासद बोलत आहेत.

 यावेळी ज्येष्ठ सभासदांनी कारखाना प्रशासनाकडे अशी मागणी केली की येणाऱ्या काही दिवसांमध्येच जे बिगर सभासद कामगार भरले गेले आहेत ते त्वरित घरी पाठवा व त्यांच्या जागेवरती सभासदांच्या मुलांना प्राधान्य द्या.

 जर असे केले नाही तर तिथून पुढे होणाऱ्या घटनांसाठी कारखाना प्रशासन जबाबदार राहील.

 नक्की या कोणत्या घटना घडणार आहेत असे देखील सभासद वर्गांमधून आता चर्चा होते. तर काही सभासदांमधून बोलले जात आहे की जर कारखाना चेअरमन संचालक मंडळ यांनी सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागणी केलेल्या विषयाची दखल घेतली नाही तर लोकसभेची पुनर्रुत्ती विधानसभेला देखील होऊ शकते?

 आदरणीय दादांच्या अधिपत्याखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चालवला जातो आदरणीय दादांनीच या विषयांमध्ये लक्ष घालून सभासदांना न्याय द्यावा अशा आशियाचे पत्र सभासदांद्वारे दादांना पाठवणार असल्याची देखील माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

 बिगर सभासद कामगारांवरती कारवाई होत असताना कोणताही भेदभाव न करता कारखाना प्रशासनाकडून कारवाई होणार का?

 काही कामगारांना या विषयाची काही महिन्यांपूर्वीच बातमी लागल्यामुळे त्यांनी काही महिन्यापूर्वी स्वतःच्या नावावर ती शेत खरेदी करून कारखान्याचे सभासदत्व घेतले असल्याची देखील माहिती समोर येत आहे? वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंत ज्याच्या नावे उसच आला नसेल तो सभासद ग्राह्य न धरता अशा बिगर सभासदांवरती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने त्वरित कारवाई करून सभासदांच्या मुलांना न्याय द्यावा अशी मागणी सभासद वर्गांमधून होत आहे.